हुंडा कमी दिल्याने माहेरून २५ लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर, ता.यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। हुंडा कमी दिला म्हणून माहेरहुन घरखर्चासाठी २५ लाख रूपये आणावे असे म्हणत कासवा ता.यावल येथील माहेर असलेल्या विवाहितेला मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या पतीसह सात जणांविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक मिळालेली माहिती अशी की, काजल सुनिल परदेशी यांचा विवाह जळगाव तालुक्यातील रायपूर येथील सुनिल भगवान परदेशी यांच्याशी झाला. लग्नात वडीलांनी हुंडा कमी दिला आहे. तु माहेरहून घर खर्चासाठी पंचविस लाख रूपये आणावे अशी मागणी पती सुनिल परदेशी याने केली . परंतू वडीलांची परिस्थिती हलाखीची असल्याने एवढे पैसे देवू शकत नसल्याचे विवाहिता यांनी सांगितले. यावरून पती सुनिल याने विवाहितेला मारहाण करण्यास सुरूवात केली. सासू, सासरे, जेठ, जेठाणी, चुलत जेठ आणि नणंद यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. सुरूवातीला विवाहितेने महिला दक्षता विभागात तक्रार दिली होती. त्याठिकाणी देखील पती हजर राहत नसल्यामुळे अखेर बुधवारी महिलेच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात पती सुनिल परदेशी, सासू रेखा परदेशी, सासरे भगवान परदेशी, जेठ विजय परदेशी, जेठाणी सिमा परदेशी, नणंद आशा परदेशी, चुलत जेठ मनोज परदेशी ( सर्व रा. रायपूर ता. जि.जळगाव ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुधाकर पाटील करीत आहे.