मातोश्री फाऊंडेशन च्या वर्धापन दिना निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्याचे वाटप
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथून जवळच असलेल्या पिंपरुड येथील मातोश्री फाऊंडेशन, पिंपरुड फाटा फैजपूररोड यांच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त व राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक २ ऑक्टोबर रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वागत सत्कार करून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करून तसेच कोरोनायोद्धे असलेले पत्रकार यांचा स्वागत सत्कार करून वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्याच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त प्रा डॉ ए के जावळे हे होते.सोहळ्याची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या तैलचित्राचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून माल्यार्पण करण्यात आले नंतर पिंपरूड येथील शालेय विद्यार्थिनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली, उपस्थित मान्यवर व पत्रकारांचा स्वागत सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन संस्थेतर्फे करण्यात आला तदनंतर टीडीएफ मुंबई यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती त्या स्पर्धेत ज्ञानेश्वरी धांडे धनाजी नाना विद्यालय खिरोदा, सुवर्णा महाजन भारत विद्यालय न्हावी या विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला तसेच पिंपरुड येथील घ,का, विद्यालय आमोदा तील विद्यार्थिनी निसर्गा ललित पाटील ही दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम आली आहे यांचा तसेच प्रा डॉ आर आर राजपूत सर यांचा अभिष्टचिंतन पर स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरवांकित करण्यात आले तसेच सावदा फैजपूर परिसरातील विविध परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांंंचा प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत सत्कार करून त्यांनाााा सन्मानित करण्यात आले तर गरजू विद्यार्थ्यांंंना शालेय साहित्याचे हे वाटप मान्यवरांच्या हस्ते्ते करण्यात आले.
वेळी संस्थेच्या देहदान उपक्रमात ५० व्यक्तींनी संकल्प फार्म भरून सहभाग नोंदवला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत व्यक्त करतांना संस्थाध्यक्ष जनार्दन जंगले म्हणाले की आम्ही जरी नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यात असलो तरीसुद्धा आमच्या या जन्मभूमीचे व समाजाचे ऋनांकित आहोत या सद भावनेतूनच गावाचा सर्वांगीण विकास व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी मातोश्री फाउंडेशनची स्थापना गुरुवर्य महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने केली आहे यास सर्व ग्रामवासीयांनी आमच्या खांद्याला खांदा लावण्याची रास्त अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे सदर कार्यक्रम जागेचा बदल हा ऐनवेळी च्या जोरदार पाऊस मुळे झाला आहे
याप्रसंगी संस्थेच्या सौ मधूबला जंगले व लेफ्टनंट डॉ आर आर राजपूत यांनी समयोचित मार्गदर्शन मनोगत व्यक्त केली तर अध्यक्षीय मनोगतात प्रा डॉ एके जावळे यांनी उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांना म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती व मातोश्री फाऊडेशन चा वर्धापन दिन सोहळा हा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक असाच आहे या महान विभूतींनी आपल्या अंतर्गत गुलामांना वृद्धिंगत करत देशाची व समाजाची सेवा करीत आपणास गांधीजींनी अहिंसेचा मंत्र तर शास्त्रीजींनी जय जवान जय किसान चा मंत्र दिला आहे या मंत्राना आपण सर्वांनी आत्मसात केल्यास आपण खऱ्या अर्थाने गुणवंत व किर्तीवंत असे विद्यार्थी घडाल व देशाच्या जडणघडणीत आपला खारीचा वाटा अवश्य उचलू असे प्रतिपादन त्यांनी केले आहे मराठी शाळेचे मुख्याध्यापक सलीम तडवी यांनी आभाराचा गोड कार्यक्रम केला याप्रसंगी प्रभा मंचावर प्रा डॉ विकी जावळे लेफ्टनंट आर आर राजपूत सौ मधुबाला जंगले ,शालिनीताई चौधरी,पिंपरुड उपसरपंच संजय तायडे ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील, सुधाकर पाटील,व्ही ओ चौधरी सर, सेवानिवृत्त सुधीर राजपूत ,पत्रकार संजय सराफ ,मलक शकिर,अरुण होले,उमाकांत पाटील, निलेश पाटील ,राजेंद्र तायडे, तसेच प्रकाश चौधरी ललित पाटील या सह पिंपरुडग्रामस्थ व पंचक्रोशीतील विविध शाळांमधील प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थी व पालक उपस्थित होते