धनाजी नाना महाविद्यालयातील NSS तर्फे दत्तक गाव कळमोदा येथे ग्राम वाचनकट्ट्याचे उद्घाटन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपुर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथील धनाजी नाना महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना(NSS) विभागा तर्फे दत्तक गाव ग्रामपंचायत कार्यालय कळमोदा येथे कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्ट्याचे उद्घाटन आज ता.२ आक्टो. शुक्रवार रोजी युवानेते धनंजय शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांनी देशासाठी केलेले अमूल्य योगदान अतिशय महत्वाचे असून ग्रामविकासा बरोबर वाचन संस्कृती समृद्धीसाठी वाचन कट्टा स्थापन करणे हा अतिशय चांगला उपक्रम आहे. ‘खेड्याकडे चला ‘हा त्यांनी दिलेला मंत्र स्वातंत्र्यानंतर अमलात आला असता तर आज खेड्यांची स्थिती अत्यंत प्रगतीशील झाली असती असे मनोगतात मांडले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळमोदा गावाच्या सरपंच श्रीमती सरला पाटील होत्या. त्यांनी आपण या उपक्रमासाठी मनापासून धनाजी नाना राष्ट्रीय सेवा योजना विभागाला सहकार्य करू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी वाचन कट्टा आयोजनामागील भूमिका पुढीलप्रमाणे कथन केली. राष्ट्रीय सेवा योजना एककाने दत्तक गावाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आरोग्यविषयक विविध समस्यांवर स्वयंसेवकांद्वारे काम केले जाते. दत्तक गावाचा सर्वांगीण विकास व्हावा शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास करून गावाच्या विकासात प्रगतीत प्रत्येक गावकरी यांचा हातभार लागावा यासाठी नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्यांच्यातील वाचनसंस्कृती लुप्त होऊ नये यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दत्तक गावात कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा स्थापन करावा असा विद्यापीठाचा मानस आहे. या उपक्रमांतर्गत दत्तक गाव कळमोदा येथे येथे आज रोजी कवयित्री बहिणाबाई वाचनकट्टा चे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या निर्देशानुसार वाचनकट्टा नियंत्रण समिती गठित करण्यात आली. सरपंच श्रीमती सरला पाटील या समितीचे अध्यक्ष आहेत. प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी – उपाध्यक्ष,रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक सूर्यवंशी या समितीचे कोषाध्यक्ष असतील ग्रामपंचायत सदस्य श्री.विलास पाटील-सचिव, अंगणवाडी सेविका – सहसचिव,ग्रामसेवक,तलाठी,
पोलीस पाटील हे या नियंत्रण समितीचे सदस्य आहेत. उद्घाटनप्रसंगी कळमोदा वाचनकट्टा नियंत्रण समितीतील सदस्य आवर्जून उपस्थित होते.हा वाचनकट्टा आपण कळमोदा ग्रामस्थ येथील विद्यालय आणि महाविद्यालय यांच्या समन्वयाने आपण उत्तम प्रकारे चालवू असे आश्वासन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सरला तडवी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. शेरसिंग पाडवी यांनी मानले.