भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

Breaking | मधुकर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या प्रक्रियेला स्थगिती !

फैजपूर, ता. यावल, मंडे टू मंडे न्यूज | गेल्या दोन दिवसांपासून मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलन ते रास्ता रोको आंदोलन करत असतांना दुसरीकडे विधानसभेत आमदार राजूमामा भोळे यांनी कारखान्याच्या लिलावाबाबत प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर सहकार मंत्र्यांनी या कारखान्याच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.

मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी बँक सिक्युरटायझेशन नियमाच्या अंतर्गत केली असून खासगी मालकाने याचा गाळप हंगाम सुरू केला आहे. मात्र, कर्मचार्‍यांची थकीत देणी देण्यास नवीन मालकांनी नकार दिल्याने कर्मचार्‍यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी साखर कारखान्यातआले असता त्यांची गाडी अडवून कर्मचाऱ्यांनी काहीही झाले तरी आंदोलन मागे न घेण्याचा इशारा देत रोष व्यक्त केला.

आज सकाळपासून कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने कर्मचारी आक्रमक झाले असताना जळगावचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेत मधुकर साखर कारखान्याच्या निविदा प्रक्रियेचा प्रश्‍न उपस्थित करून शेतकरी आणि कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणात देणी बाकी असतांना फक्त १५ कोटी रूपये घेऊन खासगी मालकाच्या ताब्यात हा कारखाना कसा दिला ? असा प्रश्‍न उपस्थित करत सदरील निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली. यावर सहकार मंत्र्यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!