भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

फैजपुरात मटका (सट्टा) व्यवसाय जोमात; पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह…..!

सावदा (विशेष प्रतिनिधी)। फैजपूर शहरात गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून मटका (सट्टा ) या अवैध व्यवसायाला जोर आलेला असून लॉकडाऊन काळात सर्व व्यवसाय बंद असताना सुद्धा सट्टा-मटका हा अवैध व्यवसाय सुरूच होता व आजही या व्यवसायाने मोठया प्रमाणावर जोर धरला असुन जोमात सुरू आहे, या मटका-सट्टा अवैध धंद्याला अभय कोणाचे…? हा प्रत्येक ठिकाणी मोठा चर्चेचा विषय बनला आहे.

फैजपूर शहरातील बसस्थानक परिसर, सुभाष चौक परिसर, न्हावी दरवाजा परिसर, डेली बाजार परिसर या सर्वच ठिकाणी महिला पुरुषांची मोठी वर्दळ असते, डेली बाजार परिसर या ठिकाणी भाजीपाल्याचा बाजार भरत असतो त्या ठिकाणी भाजी विक्रेते नागरिक, शेतकरी महिलांची, बाजारकरू महिला, पुरुष ,लहानमुले यांची मोठी वर्दळ असते हा परिसर तसेच शहरात इतरत्र जवळजवळ २० ते २२ सट्टा बिटिंग घेणारे एजंट हे सट्टा लिहीत असतात त्यांच्या मार्फत रोजचा लाखोंचा व्यवसाय होत असतो. ऐन दिवाळीचा सण, काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, आधीच अनेक लोकांचे लॉकडाऊन मुळे रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ आली आहे, रोजगार उपलब्ध नसताना लोक सट्टा-मटक्याच्या आहारी जात आहेत त्या मुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. या सट्टा-मटका बेटिंग च्या मुख्य पेढिचा ‘ केंद्रबिंदू ‘ हा सुभाष चौकातील पोलिस चौंकी पासून हाकेच्या अंतरावर असून सर्व आवक-जावक येथूनच होत असते, एकंदरीत या सट्टा-मटका व्यवसायाला कोणाचेही बंधन दिसून येत नसल्याने यासंदर्भात पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह …..? उपस्थित केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!