यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळविले
फैजपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील फैजपूर पोलिसस्टेशन हद्दीत बामणोद येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कोण्या अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघळकीस अली.
मिळालेली अधिक माहिती अशी की,फैजपूर येथून जवळच असलेल्या बामणोद येथील सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी दि ११ जून रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान आपल्या घरात एकटीच होती , तिचे आई वडील घरी आले असता त्यांना मुलगी घरात दिसली नाही त्यांनी तिचा तिच्या मैत्रिणी व नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता ती कुठेही मिळून आली नाही तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसस्टेशनला तक्रार दाखल केल्याने फैजपूर पोलिसस्टेशनला अज्ञात व्याक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.