यावल तालुक्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार, रावेर तालुक्यातील तरुणाला अटक
फैजपूर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील एका तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक ठिकाणी वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेऊन तिची फसवणूक केल्याने रावेर तालुक्यातील तरुणाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
यावल तालुक्यातील एका ३२ वर्षीय तरुणीशी रावेर तालुक्यातील वडगाव येथील रामचंद्र वाघोदे याने प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सन २०१७-२०१८ पासून ते आतापर्यंत वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध रावेर तालुक्यातील गरबर्डी धरण, भुसावल येथील दोन हॉटेल मध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेऊन त्यातून ती तीन वेळा गर्भवती राहिली असता आरोपीने तिला आयुर्वेदिक औषधे देऊन पीडितेचा गर्भपात केला मात्र त्या नंतरही रामचंद्र याने तिच्याशी लग्न करण्यास नकार देऊन तिची फसवणूक केल्याने तरुणीच्या आशा तक्रारी नुसार फैजपूर पोलिसात तक्रार दाखल केल्याने फैजपूर पोलिसस्टेशनला रामचंद्र संघरत्न वाघोदे रा.वडगाव ता.रावेर, या संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि निलेश वाघ यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम जे शेख करीत आहे.