भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

समरसता महाकुंभात जगद्गुरूंच्या हस्ते दानदात्यांचाही सन्मान

फैजपूर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दिनांक २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ यादरम्यान संपन्न होत असलेल्या सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तथा अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार आयोजित समरसता महाकुंभात श्री निष्कलंक धाम वढोदा येथे बांधण्यात आलेल्या तुलसी हेल्थ केअर सेंटर व श्री जगन्नाथ गौशाला या प्रकल्पाला परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज यांच्यावर विश्वास व श्रद्धा असलेल्या भाविकांनी तन-मन-धनाने भरभरून सहकार्य केल्याने त्यांना एक सन्मानपत्र उपस्थित जगद्गुरु संत महंतांच्या हस्ते शुभ हस्ते देऊन आशीर्वाद दिले.


महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी कोणालाही दान मागणी केली नाही तर स्वतःहून महाराजांवर विश्वास व श्रद्धा ठेवून भाविकांनी या प्रकल्पासाठी भरभरून सहकार्य केले हेच या प्रकल्प कार्याचे विशेष फलित आहे. यात निष्कलंक धाम इमारत निर्माण निधी तसेच समरसता महाकुंभ या तीन दिवसाचे जेवण, नाश्ता, मिनरलवाटर, बॅनर, स्टिकर, ड्रायफ्रूट, स्टेज, साऊंड सिस्टिम, फोटो, व्हिडिओ, मंडप, फुल माळा, निमंत्रण पत्रिका अशा वेगवेगळ्या कामांसाठी सर्वांनी मोठ्या उत्साहाने दान दिल्याने हा कार्यक्रम सुंदर शिस्तबद्ध आणि हजारो भाविकांच्या संत महंतांच्या उपस्थितीत साजरा झाल्याने जगद्गुरु सतपंथाचार्य ज्ञानेश्वरदासजी महाराज यांनी सर्वांचे आभार मानून आशीर्वाद दिले. त्यांनी आपल्या आशीर्वाचनात सांगितले की, आपण आम्हाला संत म्हणतात कारण संत समाजासाठी, देशासाठी आपले जीवन समर्पण देत असतात आणि अशा संतांना जे दान धर्म करतात ते सुद्धा संतच आहे. श्रद्धा व विश्वास असलेल्या भाविकांच्या हृदयात जो परमात्मा आहे तोच हे आपल्याकडून करून घेतो. आपल्या तन, मन, धनाच्या सहकार्याने ग्रामीण भागात असलेले वढोदा या गावी सुंदर असे निसर्गोपचार केंद्र निर्माण झाले आहे. भविष्यात याचा खूप मोठा विस्तार होऊन असंख्य रुग्णांना याद्वारे सेवा मिळणार आहे. ही आपल्या सर्व परिवाराची खूप मोठी परमेश्वर सेवा आहे. सद्गुरु ब्रह्मलीन जगन्नाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने जनता जनार्दनाच्या जनार्दनाने हा संकल्प पूर्णत्वास नेला आहे. ही आपल्या साठी अभिमानाची बाब आहे. दानदात्यांना परमपूज्य जगद्गुरु ज्ञानेश्वर दासजी महाराज, परमपूज्य महामंडलेश्वर धर्मदेवजी महाराज, श्री राधे राधे बाबा, महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, सुरेश शास्त्री मानेकर बाबा, शास्त्री भक्ती किशोरदास जी महाराज, यांच्या समवेत संत महंत यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!