फैजपूर खंडोबा यात्रेनिमित्त आलेल्या अल्पवयीन मुलीला पळविले
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलगी आपल्या भाऊ व नातेवाईकांसमावेत फैजपूर येथील खंडेराव यात्रेत आली असता दोघांनी दम देत मुलीला मोटारसायकल वर बसून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील एक मुलगी फैजपूर येथे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने मुलगी, तिचा भाऊ आणि नातेवाईक असे तिघेजण २० मार्च रविवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आले असता यात्रेतून घरी परत जात असताना जीवन अशोक भालेराव रा. भालोद ता. यावल आणि आकाश संजय भागेश्वर रा. सावदा ता. रावेर हे दोघे दुचाकीवर येऊन “मुलीला सोडले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत दोघांनी पीडीत मुलीच्या भावाला व नातेवाईकाला धक्का बुक्की करत पिडीत मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेले.या बाबत फैजपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने संशयित आरोपी जीवन अशोक भालेराव रा. भालोद ता. यावल,व आकाश संजय भागेश्वर रा. सावदा ता. रावेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फैजपूर पोलीस करत आहेत.