दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ : सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल
फैजपूर, मंडे टू मंडे वृत्तसेवा: फैजपूर शहरात नवीन घर घेण्यासाठी माहेरहून २ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून छळ सहन न झाल्याने याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील इस्लामपूरा येथील माहेर असलेल्या आसमाबी अझरोद्दिन शेख वय-२८ यांचा रितीरिवाजानुसार २०१७ मध्ये भुसावळ येथील अझरोद्दीन रईसोद्दिन शेख यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर सुरूवातीचे दोन महिने चांगले गेले. त्यानंतर घर बांधण्यासाठी पती अझरोद्दीन शेख याने विवाहितेला माहेरहून दोन लाख रूपये आणावे असा तगादा लावला विवाहितेचा माहेरची परिस्थिती नाजूक असल्याने पैश्यांची व्यवस्था न झाल्याने याचा राग आल्याने पती अझरोद्दीन याने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तर सासू, सासरे, दिर, मोठी नणंद यांनी गांजपाठ केला. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता बाहेरी निघून आल्या. शनिवार १९ फेब्रुवारी रोजी विवाहितेन फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती अझरोद्दीन रईसोद्दिन शेख, सासून रजीयाबी रईसोद्दीन शेख, रईसोद्दिन अमरोद्दिन शेख, मोहंमद रइसोद्दिन शेख, सर्व रा. भुसावळ, सिरीनबी ईस्माईल शेख, आणि नसरिबी जुबेर शेख रा. जामनेर यांच्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.