न्हावी येथे विवाहितेला मारहाण करून विनयभंग
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथून जवळच असलेल्या न्हावी येथील ३० वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी दीर,सासू-सासरे यांच्या विरोधात फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील फैजपूर येथून जवळच असलेल्या न्हावी येथे
बुधवार ९ मार्च रोजी सकाळी ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास विवाहितेचे सासरे व ३० वर्षीय विवाहिता यांच्यात कौंटुबिक वाद निर्माण झाला. यावरून विवाहितेच्या दिराने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करत तीला पकडून तिचा विनयभंग केला.विवाहितेच्या सासऱ्यांना दारूचे व्यसन असल्याने
भांडण सोडवण्यासाठी विवाहितेचा पती आला असता त्याला देखील मारहाण करत तुझ्या मुलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही दिली. याप्रकरणी विवाहितेने फैजपूर पोलिसस्टेशनला तक्रार दिल्याने दीर, सासू, सासरे यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.