मुख्याध्यापकाचे विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे, यावल तालुक्यातील प्रकार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेचा मुख्याध्यापक विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे करत असल्याबाबची तक्रार स्थानिक शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी केल्याने एकच खडबड उडाली.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक हा विद्यार्थीनींना जवळ बोलावून गोड बोलून त्यांच्यासोबत अश्लिल चाळे करत होता या बाबतची तक्रार त्या गावातील स्थानिक शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्याकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दाखल घेत गटविकास अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले. या संदर्भात पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी शुक्रवार ११ मार्च रोजी शाळेत जावून येथील विद्यार्थींनी आणि पालकांशी संवाद साधत पालकांसह विद्यार्थ्यांनींचे जाबजबाब नोंदविले असता पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. .गटशिक्षणाधिकारी शेख यांनी अहवाल गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांचेकडे सादर केला आहे. याप्रसंगी पाडळसे केंद्र शाळेचे केंद्र शिक्षक सुनील पाटील ही उपस्थित होते.