फैजपूर येथील खंडोबा यात्रोत्सव तीन ऐवजी सात दिवसांचा !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर, ता. यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथील खंडोबा
देवस्थानाचा यात्रोत्सव यंदापासून तीन दिवसांऐवजी सात दिवसांचा असणार आहे. दिनांक १७ ते २४ मार्चच्या दरम्यान हा यात्रोत्सव राहणार आहे.त्यासाठी प्रशासनातर्फे परवानगी प्राप्त झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज यांनी दिली.
होळीपासून प्रारंभ गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे यात्रोत्सव बंद होता. या वर्षी यात्रोत्सव होत असल्याने, भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. १७ रोजी होळीच्या दिवशी सकाळी संत महंतांच्या उपस्थितीत महापूजा होऊन यात्रोत्सवाला प्रारंभ होईल.
यावेळी त्यांनी कोरोना नियमांचे पालन करून, यात्रोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी कैलास कडलग,डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे,फैजपूर मुख्याधिकारी वैभव लोंढे, सपोनि.सिद्धेश्वर आखेगावकर यांनी खंडोबा देवस्थान परिसराला स्थळाला भेट देऊन पाहणी केली. यात्रोत्सवाच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, दुकानांमध्ये अंतर ठेवणे आदीबाबत चर्चा झाली. याचबरोबर, पोलीस ठाण्यातही अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक पार पडली.