फैजपुरात लॉकडाउन चे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर (प्रतिनिधी)। जळगाव जिल्हाधिकारी यांच्या तीन दिवसीय लॉक डाऊन आदेशचे उल्लंघन करणाऱ्यांवर फैजपुरात नगरपरिषद व पोलिस स्टेशन अंतर्गत संयुक्तपणे दंडात्मक कारवाई सुरू असून दिनांक अठ्ठावीस एकोणतीस तीस रविवार सोमवार मंगळवार जिल्हाधिकारी जळगाव यांनी तीनदिवसीय लॉक डाऊनचे आदेश काढल्यानंतर या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे यासाठी तीनदिवसीय लॉक डाऊन जाहीर केले जे नागरिक नियमांचे उल्लंघन करीत आहेत त्यांच्यावर शहरात नगरपरिषद व पोलिसांतर्फे सर्वत्र दंडात्मक कारवाई सुरू झाली असून कोरूनाचा वाढता संसर्ग पाहता शासन काटेकोरपणे पालन करीत असून नागरिकांनी सुद्धा याचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा राज्यात लॉक डाऊन करावे लागणार असे वेळोवेळी जनतेला आवाहन केले असून आता तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे तरच कोरोना सारख्या भयंकर आजाराला आळा बसेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी जाहीर केले .
याच पश्वभूमीवर फैजपूर पोलिसांतर्फे या फैजपूर सह परिसरातील पोलिस स्टेशन हद्दीतील फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण हमीद तडवी यांच्यासह एपीआय प्रकाश वानखडे तसेच पीएसआय रोहिदास ठोंबरे पीएसआय मकसूद यांच्यासह पोलिस कर्मचारी अनिल महाजन वाहतूक पोलिस बाळू भोई दिनेश भोई,एसडीपीओ वाहनचालक दिलीप तायडे तसेच अल्ताफ शेख पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी होमगार्डस सागर तायडे योगेश कापडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला असून तीन दिवस लॉक डाउन चे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच नियमाचे पालन व बीना मार्क्स विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर अशीच दंडात्मक कारवाई सुरू राहणार असल्याचे विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे तसेच एपीआय प्रकाश वानखडे यांनी सांगितले