फैजपूर पोलिस ठाण्यातच लाच स्वीकारताना तिघे पोलीस एसीबी जाळ्यात
फैजपूर,ता.यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी चार हजाराची लाच घेताना फैजपूर पोलिसस्टेशन मधील तिन पोलिसांना आज दुपारी पोलिसस्टेशन मधेच लाच घेताना रंगेहात अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे
तक्रारदार पाडळसे ,ता.यावल येथील रहिवासी असून यांचा फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीमधील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे. फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे हेमंत वसंत सांगळे, किरण अनिल चाटे, यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्त्याच्या क्लबवर कोणतीही जुगाराची कारवाई न करता सदर जुगाराचा क्लब सुरळीत चालु राहु देण्याच्या मोबदल्यात दरमहा ४,०००/रु.प्रमाणे लाचेची मागणी केल्याबाबत तक्रार दिली होती. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी आज तक्रार देवून फैजपुर पोलीस स्टेशन येथे जावून वरील दोन्ही आरोपीतांची भेट घेण्यास गेले असता त्यांना हेमंत वसंत सांगळे हे भेटले त्यांनी तक्रारदार यांचेकडे कामाची व पैशाची बोलणी करून त्यांचे मोबाईल फोनवरून किरण अनिल चाटे यांना फोन करून तक्रारदार हे देत असलेल्या पैशांबद्दल बोलणी करून किती पैसे घ्यायचे याबाबत स्वतः बोलणी करून तक्रारदार यांचेकडे फोन देवून तक्रारदार व चाटे यांचे बोलणे करून दिले तसेच चाटे यांनी त्यांचे फोनवरून सांगळे यांच्या फोनवर बोलून लाचेच्या रक्कमेत तडजोड करून सदर लाच रक्कम सांगळे यांचेकडे देण्यास सांगितले. त्यानुसार सांगळे यांनी तक्रारदार यांचेकडे स्वतःसाठी व चाटे यांचे साठी ३,०००/- रुपये लाचेची मागणी करून पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेतील महेश ईश्वर वंजारी या अंमलदारांसाठी १,०००/-रु.अशी एकुण दरमहा ४,०००/रु.प्रमाणे लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम सांगळे यांनी पंचासमक्ष स्वतःस्विकारून
यांचेजवळ दिली,
सदर रक्कम पत्त्याचा क्लब सुरळीत चालु देण्यासाठीची लाच रक्कम स्वीकारली. म्हणून १)हेमंत वसंत सांगळे, वय-५२ वर्ष, स.फौ.९१२ नेम.फैजपुर पोलीस स्टेशन ता.यावल जि.जळगाव. (वर्ग-३) फैजपुर ता.यावल जि.जळगाव. २)किरण अनिल चाटे, वय-४० वर्ष, पो.ना./९३० नेम.फैजपुर पोलीस स्टेशन ता.यावल जि.जळगाव. (वर्ग-३) फैजपुर ता.यावल जि.जळगाव.
३) महेश ईश्वर वंजारी, वय-३८ वर्ष, पो.ना./२०१२ नेम.फैजपुर पोलीस स्टेशन ता.यावल जि.जळगाव. (वर्ग-३)
फैजपुर ता.यावल जि.जळगाव. या तीन्ही आरोपीतांविरुद्ध फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे,
सदरची कारवाई श्री.शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.. एस.के.बच्छाव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. स.फौ.दिनेशसिंग पाटील,पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने. श्रीमती. एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाज पो.ना.सुनिल वानखे पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर. यांनी केली.