नगरपालिकेच्या आरोग्य विभागात शौचालय साहित्य उपलब्ध – फैजपूर मुख्याधिकारी वैभव लोंढे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। येथील नगरपालिकेच्या आरोग्य विभागात शौचालय साहित्य उपलब्ध असून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व शौचालय साहित्य नगर पालिकेत उपलब्ध असल्याचे स्वतः पत्रकारांना दाखवतांना माहिती दिली.
गेल्या काही दिवसापासून नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात शौचालय खरेदी कागदपत्रावर झाल्याची चर्चा सुरू होती परंतु नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी सर्व साहित्य उपलब्ध असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आणि जो तक्रारदारांना साहित्य दाखवण्याचा विलंब झाला तो नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक लक्ष्मण चावरे हे आपल्या परिवाराच्या कामाच्या ताणामुळे वेळेवर साहित्य तक्रारदारांना दाखवू शकले नाही त्यामुळे मुख्य अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले तरी या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले व मागील बिलासंदर्भात सुद्धा सखोल चौकशी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले