‘तू माझ्या बहिणीशी का बोलतो?’ जाब विचारत तरुणांवर विळ्याने वार
फैजपूर,ता.यावल ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। फैजपूर येथून जवळच असलेल्या न्हावी येथे ‘तू माझ्या बहिणीशी का बोलतो?, असे म्हणत एका २३ वर्षीय तरुणाच्या मानेवर विळ्याने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली.
- मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत प्रभारी महिला सरपंच अवघ्या पाच दिवसात अपात्र …….
- मुक्ताईनगर मध्ये गावठी कट्टा सापडल्याने खळबळ, तरुणाला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- शाळेतील जबाबदार कर्मचाऱ्यानेच केला तब्बल १० चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग
दि १२ जून रा रविवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास न्हावी येथून जवळच असलेल्या बोरखेडा येथील जितेंद्र अनिल तळेले (वय २३ रा. बोरखेडा ता. यावल) हा युवक न्हावी येथील धनगर वाडा येथे उभा असताना मयूर उर्फ डीगंबर जनार्दन तळेले, रा. न्हावी ता. यावल याने तू माझ्या बहिणीशी का बोलतो?, मी तुला जिवंत ठेवणार नाही,असा जाब विचारत शिवीगाळ करून जितेंद्र च्या मानेवर हातातील लोखंडी विळा ठेवत गंभीर दुखापत केली.
जखमी जितेंद्र ला रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले असून जितेंद्र तळेले यांच्या फिर्यादी वरून मयूर उर्फ डीगंबर जनार्धन तळेले याच्याविरुद्ध फैजपूर पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.