भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलरावेर

परवानगी नसताना बायोडिझेल विक्री कशी सुरू होती : तहसीलदार यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत आ.चंद्रकांत पाटील यांचा सवाल

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

फैजपूर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। बायोडिझेलचा कोणताही प्रकारचा परवाना नसतानाही सावदा हद्दीत सुरू असलेल्या बायोडिझेल विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती असा सवाल करत विक्री कशी सुरू होती. या प्रकरणी रावेर तहसीलदार यांच्या कार्यप्रणालीवर आ.चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

सावदा हद्दीत बायोडिझेल विक्रीचा विषय गेल्या काही दिवसांपासून गाजत असून न्युज पोर्टल मीडियाच्या माध्यमातून हा सर्व प्रकार उजागर झाला होता त्यात आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी उडी घेतली असून त्यांनी ठेव तहसीलदार यांच्या कार्य प्राणालीवर प्रांताधिकारी कडलक यांच्या कडे भेट घेऊन नाराजी व्यक्त केली आहे. बायोडिझेलचा कोणताही प्रकारचा परवाना नसतानाही ही विक्री कशी कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती. पंपावर कारवाई केली मात्र याबाबत पोलिस स्थानकात कोणतीही फिर्याद दिली नाही किंवा बायोडिझेल पंपचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी का पाठवले नाही, यात कोणी अधिकारी दोषी असेल त्यांची मी स्वतः तक्रार करणार आहे त्यामुळे बायोडिझेल विक्रीसाठी कोठून उपलब्ध होते याबाबत महसूल अधिकारी यांनी याचा तपास केला का? तसेच पोलिस प्रशासन यांना कारवाई साठी पत्र अथवा गुन्हा का दाखल केला नाही असे गंभीर प्रश्न उपस्थित पाटील उपस्थित केले आहे. त्यामुळे रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली

बायोडिझेल विक्रीची कोणतीही परवानगी नसताना सावदा विभागात बिनधास्तपणे बायोडिझेल विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे यात मागील एका आठवड्यात फक्त सावदा हद्दीतील बायोडिझेल पंपावर सील केले ही कारवाई रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी त्या पंपावर कारवाई केली मात्र पोलिसात कोणतीही फिर्याद दिली नाही किंवा बायोडिझेल पंपचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी का पाठवले नाही त्यामुळे महसूल अधिकारी यांच्या कार्यप्रणाली वर शंका उपस्थित होत आहे यात काही आर्थिक चिरी मिरी तर नाही असा थेट सवाल आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी बुधवारी दुपारी प्रांताधिकारी कार्यलायत प्रांताधिकारी कैलास कडलग यांची भेट घेऊन उपस्थित केला यावर वस्तूनिष्ठ अहवाल मागवून दोषी वर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी सांगितले. यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते हे येत्या काळात कळेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!