भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

मद्यविक्रेत्याकडून लाच घेतांना फैजपूर पोलिस स्टेशनचा पोलिस नाईक एसीबीच्या जाळ्यात

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपूर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथील पोलीस ठाण्यातील गोपनिय विभागातील पोलीस नाईक अनिल भगवान महाजन याला ५०० रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. दारूचा व्यवसाय नियमित सुरू ठेवावा यासाठी पोलीस नाईक याने लाचेची मागणी केली होती. दरम्यान, या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूच्या व्यवसाय असलेल्या तक्रारदाराला त्यांचे दारू विक्री सुरू ठेवाण्यासाठी दर महिन्याला ५०० रूपये द्यावे लागतील अशी मागणी फैजपूर पोलीस ठाण्यातील गोपनिय विभागातील पोलीस नाईक अनिल महाजन यांनी तक्राराकडे केली होती. मात्र याप्रकरणी तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार दिल्याने यासंदर्भात शहानिशा करण्यासाठी आज दुपारी २ वाजता सापळा रचून संशयित आरोपी पोलीस नाईक अनिल भगवान महाजन यांना ५०० रूपये घेतांना रंगेहात पकडल्याने तालुका वर्तुळाचे प्रचंड खळबळ माजली आहे.

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांच्यासह पोलीस अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!