फैजपूर पोलीस पाटील संघाची कार्यकारणी जाहीर, अध्यक्षपदी विशाल जवरे तर उपाध्यक्षपदी दिनेश बाविस्कर
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l फैजपुर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पोलीस पाटलांची वार्षिक सभा जिल्हा संघटक सुरेश खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली फैजपूर येथे नुकतीच घेण्यात आली. यावेळी संघाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. नवीन कार्यकारणी या प्रमाणे …
अध्यक्ष- विशाल विलास जवरे (पिळोदा )
उपाध्यक्ष – दिनेश बाविस्कर( हिंगोणा )
सचिव- हरीश ज्ञानदेव चौधरी (पिंपरूड )
सहसचिव – लक्ष्मण टीपा लोखंडे (भालोद )
कार्याध्यक्ष – नरेंद्र बाबुराव मासोळे (मारुळ )
संघटक- प्रसन्न कुमार चंद्रकांत पाटील (हंबर्डी )
सदस्य- मीना अनिल चव्हाण (कोसगाव )
धनराज गोंडु कोळी (भोरटेक )
संगीता विशाल दांडगे (दुसखेडा )
भरत रघुनाथ पाटील (वनोली )
उत्तरा नारायण कोळी (कठोरा प्रसावदा)
संतोष गंभीर कोळी (करंजी)
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी अरफान रशीद तडवी बोरखेडा बुद्रुक , पुरुषोत्तम हिरामण पाटील विरोदा, तुषार दत्तात्रय चौधरी आमोदा, कैलास रामचंद्र बादशहा कासवा, फारुख मुस्तफा तडवी मोह मांडली, सद्दाम नसीर तडवी बोरखेडा खुर्द, प्रफुल्ला चौधरी ( म्हैसवाडी) आदींसह सर्व पोलीस पाटील उपस्थित होते
नवनिर्वाचित अध्यक्ष विशाल जवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस पाटलांचा सामूहिक विमा , कार्यशाळेचे आयोजन तसेच प्रवास भत्ता मिळणे कामी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले सर्व कार्यकारिणीला फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर मोताळे यांनी शुभेच्छा दिल्या आहे