भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलशैक्षणिक

राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थी घडविण्याची खाण -प्रा.विलास चव्हाण

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपूर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथील धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे दि.24 सप्टेंबर 2021 रोजी ‘राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक प्रा. उपप्राचार्य विलास चव्हाण,धुळे यांनी वरील उद्गार काढले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य कशा पद्धतीने चालते, योजना राबविण्यामागील हेतू कोणता? तसेच विद्यार्थी घड विण्यासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम कसे साजरे केले जातात. त्यातून राष्ट्रीय सेवा योजनेत अतिशय उत्तम सामाजिक भान विद्यार्थ्यांमध्ये रुजवले जाते. राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी हा महाविद्यालयातील अत्यंत खास विद्यार्थी असतो. मैत्री,सहकार्य, श्रमसंस्कार, सामाजिकभान, लोकशाही मूल्यांची जोपासना करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व संपन्न केले जाते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनाजी नाना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप केला. याप्रसंगी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना केवळ शासनाची राबवली जाणारी एक योजना नसून श्रमाची प्रतिष्ठा वाढवून जोपासना करणारी युवा स्पंदनांची चेतना जागवणारी योजना आहे. ही योजना महाविद्यालयाचे मुख्य अंग आहे,
सेवाभाव हे त्यागाचे प्रतीक असते याची जाणीव ही योजना करते.जागृत समाजभान निर्माण करणारी ही योजना आहे.या बाबी त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक रासेयो प्रमुख कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी प्रमुख अतिथिंचा परिचय करून दिला व कार्यक्रम आयोजनामागील भूमिका प्रभावीपणे मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सरला तडवी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शेरसिंग पाडवी यांनी केले.
सदर कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. मनीष करंजे, विभागीय समन्वयक डॉ. प्रमोद अहिरे, डॉ. आशुतोष वर्डीकर, डॉ.गणपत ढेंबरे आवर्जून उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील उपप्राचार्य, प्राध्यापक,सहकारी बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व रासेयोचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!