भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

सहा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करत बापाची गळफास घेऊन आत्महत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपूर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। फैजपूर बसस्थानाच्या बाजूला असलेल्या मिरची ग्राऊंड जवळ सहा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करत बापाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली .

सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,रावेर तालुक्यातील विवरा येथील मूळ रहिवाशी निलेश घनश्याम बखाल ,वय-३५ हे सध्या फैजपूर,ता.यावल येथील बसस्थानकच्या बाजूला मिरची ग्राऊंड जवळ आपल्या पत्नी व सहा वर्षाचा मुलगा आर्यन सोबत वास्तव्याला असून ते फैजपूर शहरातील बापू डेअरीचे संचालक आहेत.आज शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास निलेश बखाल यांनी पत्नीला बाजार व किराणा आणण्यासाठी बाजारात सोडले. त्यानंतर ते घरी येऊन ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून निलेश ने त्यांचा सहा वर्षाचा मुलगा आर्यन याचा गळा दाबून खून केला आणि स्वत: दोरी ने गळफास घेवून आत्महत्या केली.

त्यांची पत्नी घरी आल्यावर घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. दरवाजा ठोठावून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता दोघांचे मृतदेह आढळून आल्याने पत्नीचा जबर धक्का बसला आहे. सदर घटनेने फैजपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी दोघांना मयत घोषीत केले. सदर घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून घटनेचा तपास फैजपूर पोलीस करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!