फैजपुर येथें उपकामगार कार्यालय सुरू करावे,गवंडी कामगार संघटनेचे प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन
Monday To Monday NewsNetwork।
फैजपूर(प्रतिनिधी)। इंजिनीयर सही शिक्के देत नाही त्यामुळे खरे गवंडी कामगार शासनाच्या लाभापासून वंचित राहत आहे यासाठी शासनाने फैजपूर येथे उपविभागीय कामगार कार्यालय सुरू करावे अशी मागणी यावल रावेर तालुका गवंडी कामगार संघटनेचे तथा एम मुसा जनविकास सोसायटी व असंघटीत गवंडी कामगार संघटना अध्यक्ष शाकीर मलिक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कामगार मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालक मंत्री, यावल रावेर तालुक्याचे आमदार श्री दादा चौधरी यांना निवेदनाद्वारे केली आहे.रंगकाम करणारे पेंटर लाकडी काम करणारे सुतार तसेच महिला कामगार यांना परिसरातील इन्कम टॅक्स भरणारे दुकानदार यांच्या बिलाची मान्यता मिळण्यात यावी असे निवेदन येथील प्रांत कैलास कडलक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेनात नमूद करण्यात आले की, गेल्या पंधरा महिन्यापासून रावेर यावल तालुक्यातील ईमारत बांधकाम कामगार वर्गाच्या नूतनीकरण व नोंदणी लाभाचे कोणतेही कामे होत नसून जळगाव येथील कामगार कार्यालयामध्ये उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. यामुळे कामगार हैराण झाले आहे. तुमची नोंदणी आनलाईन झाली आहे, तुमच्या मोबाईलवर मेसेजेस येतील मात्र कामगाराच्या नूतनीकरणाचे काम अद्याप पर्यंत झालेले नाही. तर दुसरी बाजू म्हणजे बांधकाम अभियंता इंजिनिअरच्या सही शिक्केसाठी कामगारांना भटकंती करावी लागत आहे. ईमारत बांधकाम कामगारला नूतनीकरण व नोंदणीसाठी इंजिनिअरचे सही शिक्के लागत आहे. तरी पण इतर कामगार, प्लम्बर, पेंटर, सुतार, वेल्डर, हमाल, महिला कामगार साठी सुध्दा इंजिनिअरचे शिके लागत आहे. इंजिनिअर कडून खऱ्या गवंडी कामगारांना डावलण्यात येत आहे. यासह अनेक प्रश्न उपस्थित करीत आहे बरेच कामगार अशिक्षित आणि अज्ञानी असल्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन तो लावण्यात येते हा कामगारांवर अन्याय होत आहे. तरी इतर कामगार प्लम्बर, पेंटर, सुतार, महिला कामगार वर्गाच्या नोंदणी साठी जे दुकानदाराचे जी एस टी इन्कमटेक्स भरत आहे त्याचे बिल व जी एस टी नंबरवर कामगार म्हणून मान्यता देण्यात यावी. रावेर यावल तालुक्यात आदिवासी समाज व मजुर जास्त प्रमाणात आहे. त्यांना लिहिता-वाचता येत नसून प्रत्येक वेळी कामे सोडून जळगाव कामगार कार्यालयात येण्या जाण्यासाठी चार पाचशे रुपये खर्च करून परत रिकामे हाती यावे लागते. शासनाने मुक्ताईनगर, रावेर, यावल तालुक्यातील कामगारांसाठी फैजपूर येथे ईमारत कामगार उप कार्यालय लवकर सुरू करावे अशी मागणी एम मुसा जनविकास सोसायटी व असघटित गवंडी कामगार संघटना अध्यक्ष, भारतीय कामगार संघटना मुबंईचे रावेर यावल तालुका अध्यक्ष मलिक शाकिर व सर्व कामगारांनी शासन दरबारी केली आहे. फैजपूर येथे कामगार वर्गाच्या मागणीचे हे निवेदन फैजपूर उपविभागीय कार्यालयामध्ये देण्यात आले. यावेळी शेख इरफान इस्माईल उपाध्यक्ष करीम नथु तडवी सहित कामगार उपस्थित होते.