फैजपूरात गुटखा तस्करांवर कारवाई : १५ लाखांचा गुटखा जप्त : चौघांवर गुन्हा !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर ता.यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा । राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याने भरलेले वाहन शहादा येथून गुटखा सावदा शहराकडून परराज्यात नेण्यात येत असताना फैजपूर पोलिसांनी कारवाई करत सुमारे १५ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आल्याने गुटका तस्करान मध्ये खळबळ उडाली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे तर फैजपूर पोलिसात याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, फैजपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ रविवारी दुपारी महेंद्रा पिकअप वाहन (एमएच ४६ ई ६१२५) ची तपासणी केल्यानंतर त्यात १५ लाख ७० हजार ८०० रुपये किंमतीचा गुटखा आढळला. या प्रकरणी संशयीत आरोपी अरबाजखान नवाज खान पठाण व शे.जमिलोद्दीन रफियोद्दीन (शहादा, जि.नंदुरबार), साहिल रफिक मेमन (शहादा, जि.नंदुरबार) व मोहसीन शेख (अडावद) यांच्याविरोधात राजेश बर्हाटे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुटखा व वाहनासह १९ लाख २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अरबाजखान नवाज खान पठाण व शे.जमिलोद्दीन रफियोद्दीन (शहादा, जि.नंदुरबार) यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सहा.निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार देविदास सुरदास, हवालदार राजेश बर्हाटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास उपनिरीक्षक मोहन लोखंडे, कॉन्स्टेबल महेंद्र महाजन, चेतन महाजन, होमगार्ड श्रीकांत इंगळे करीत आहेत.