अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात अस्सल जीवनमूल्यांचे चित्रन आहे. – प्रा. के. के.अहिरे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर,मंडे टू मंडे वृत्तसेवा- दि.1ऑगस्ट 2021 रोजी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर. राष्ट्रीय सेवा योजना आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रसंगी प्रमुख वक्ते प्रा.के.के.अहिरे नहाटा कॉलेज, भुसावळ यांनी वरील मत व्यक्त केले. पुढे त्यांनी आपल्या मनोगतात अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य वाटेगाव पासून ते रशिया पर्यंतचा साहित्य प्रवास चित्रमय भाषेत प्रभावीपणे मांडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका मांडली व आज पासून सुरु होणाऱ्या ‘ स्वच्छ भारत अभियान पंधरवडा’ महाविद्यालयात प्रारंभ झाला असे जाहीर केले. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य मांडतांना पूज्य सानेगुरुजी विद्या प्रबोधिनी सर्वसमावेशक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, खिरोदा येथील डॉ. नाना लांडगे यांनी टिळकांच्या नेतृत्वातील बारकावे प्रभावीपणे मांडून साहित्यिक, संपादक, टिळकांची पत्रे काही मुद्दे स्पष्ट करून टिळकांना शाब्दिक अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभाग प्रमुख प्रा. मनोहर सुरवाडे यांनी प्रमुख वक्ते यांनी मांडलेल्या विचारांवर प्रभावीपणे भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शरद बिऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार रा. से. यो. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.सरला तडवी यांनी मानले. सदर कार्यक्रमाला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. शेरसिंग पाडवी, महाविद्यालयातील प्राचार्य,उपप्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.