क्राईमयावल

मधुकर साखर कारखान्या जवळ गावठी कट्टा व धारदार शास्रसह दोघाना अटक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपूर, प्रतिनिधी । न्हावी मार्ग फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर करखान्या जवळ हॉटेल तृभावी समोर दोन तरूणांना गावठी कट्टा व धारदार चाकू सह अटक केल्याची घटना सायंकाळी घडली त्याचे कडूनया सह तीन जीवंत काडतूस ही हस्तगत करण्यात आला असून केला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मधुकर सहकारी साखर करखान्या जवळ यावल – १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी विशाल गणेश सपकाळे (वय-२९) आणि दिपक शांताराम सपकाळे (वय-२६) दोन्ही रा. आमोदा ता. यावल या दोघांमध्ये फैजपूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल तृभावी समोर किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला व अचानक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले दोघेजण शस्त्र हातात घेवून हाणामारी करत असल्याची माहिती फैजपूर पोलीसांनी मिळाली. फैजपूर पोलीस स्टेशनचे सपोनि प्रकाश साहेब, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, न्हावी बीटचे पोहेकॉ राजेश बऱ्हाटे, होमगार्ड श्रीकांत इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेवून दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व ३ जीवंत काडतूसे व धारदार शस्त्र असा एकुण २३,३०० रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला असून दोघांवर फैजूपर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!