भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

युवा व गोफ भजनी मंडळ तर्फे सरदार पटेल जयंती निमित्त विविध स्पर्धां संपन्न

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपूर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव व त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळ फैजपूर यांच्या संयुक्तविद्यमाने स्वच्छ भारत अभियानाचा समारोप करण्यात आला व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतनिमित्त वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धांमध्ये गावातील अनेक विद्यार्थ्यांनी व त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळाच्या सदस्यांनी आपला उस्पूर्तपणे सहभाग नोंदविला.


त्यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छते विषयी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी माहिती देण्यात आली. स्पर्धा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रिय एकता शपथ देण्यात आली.
स्वच्छ भारत अभियानाचा समारोप व सरदार वल्लभभाई पटेल कार्यक्रम प्रसंगी फैजपूर येथील त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळाचे अध्यक्ष राहूल साळी,रोहन चौधरी,भावेश पाटील, शुभम पाटील, पुष्कर चौधरी इ. उपस्थित होते आणि कार्यक्रमाला त्रिवेणी गणेश मित्र मंडळाचे खजिनदार चेतन चौधरी सर हे पर्यवेक्षक म्हणून लाभले.तर कार्यक्रमाचे कामकाज नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखपाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका समन्वयक तेजस पाटील,पल्लवी तायडे, डिगंबर चौधरी यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळ फैजपूर अध्यक्ष राहूल साळी, रोहन चौधरी व त्रिवेणी गणेश मित्र मंडळ फैजपूरचे कार्यकर्ते गणेश चौधरी, चेतन चौधरी, भावेश चौधरी, भूषण चौधरी, अनिरुद्ध पाटील,मोहित कोलते, संकेत चौधरी व नेहरू युवा यावल तालुका समन्वयक पल्लवी तायडे, डिगंबर चौधरी यांनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!