उसनवारीचे पैसे न दिल्याने दांड्याने तरुणाला मारहाण : तिघांवर गुन्हा !
फैजपूर ता. यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा । तालुक्यातील हंबर्डी येथे उसनवारीने पैसे न दिल्याच्या कारणावरून तिघांनी तरूणाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना यावल तालुक्यातील हंबर्डी येथे घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील हंबर्डी येथील महेश सूपडू सावकारे (वय-३०) हे २४ ऑक्टोबर रोजी तडवी वाड्यात गप्पा मारत असतांना गावातील सलदार बलदार तडवी हा येवून महेशकडे उसनवारीने पैसे मागितले. दरम्यान महेशने पैसे देण्यास नकार दिल्याने सलदार बलदार तडवी, शावखॉ लालखॉ तडवी आणि लुकमान शावखॉ तडवी तिघे रा. हंबर्डी ता. यावल यांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात महेश यांच्या हाताल जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ देवीदास सरदास करीत आहे.