TET Exam Scam ; शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात ३२ शिक्षक फैजपूर मधील,”हे”बोगस शिक्षक कोण?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अपात्र परीक्षार्थींना पैसे घेऊन पात्र दाखवून जळगाव जिल्ह्यात ६१४ शिक्षक गैरमार्गाने भरती झाल्याचे उघळ झाले असून, राज्यातल्या शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्या (TET) प्रकरणी आता पर्यंत अनेकांना अटक केली असून मोठी खडबड उडाली आहे, गैरमार्गाने भरती झालेल्या शिक्षकांपैकी ३२ शिक्षक हे फैजपूर येथील असून ” हे ” बोगस शिक्षक कोण ?
शिक्षक पात्रता परीक्षेत राज्यात पास झालेल्या शिक्षकांपैकी ७,८८० शिक्षक नापास झालेले असताना नापास झालेल्या उमेदवारांची नावं पैसे घेऊन पात्रता यादीत घुसवण्यात येऊन पास दाखवण्यात आल्याचं तपासातून समोर आलं.अशा प्रकारे बोगस शिक्षकांची भरती करण्यात आलेली असून, या मुळे शिक्षक पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे उघळ झाले.जळगाव जिल्ह्यातील तब्बल ६१४ अपात्र शिक्षकांना परीक्षेत पास झाल्याचे दाखवून बनावट प्रमाणपत्रा द्वारे गैरमार्गाने परिक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरीला लागले असून त्या पैकी ३२ शिक्षक फैजपूर येथील असल्याचे उघळ झाले .फैजपूर येथील गैरमार्गाने भरती झालेले “हे” शिक्षक कोण?