भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

बनावट नोटा प्रकरण : मास्टर माईंड कोण? कुठून आणल्या बनावट नोटा? रॅकेटचा पार्दाफाश करण्याचे सावदा पोलिसांसमोर आव्हान

सावदा, ता. रावेर.जिल्हा – जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सावदा शहरात ७६ बनावट नोटा पकडल्या गेल्या. दि. १३ डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास सावदा पोलिसांनी सावदा शहरातील ख्वाजा नगर मधील शेख आरिफ शेख फारुख व अझरखान अय्युब खान या दोघांना अटक केली असून त्याच्या कडून १०० रुपयांच्या ७६ बनावट चलनी नोटा सह मोटर सायकल जप्त केली. या दोघांना या बनावट नोटा देणारा भुसावळ येथील आवेश नामक व्यक्ती फरार आहे.

भुसावळ येथील आवेश नामक व्यक्ती कडून सावदा पोलिसांनी अटक केलेल्या शेख आरिफ शेख फारुख व अझारखान शेख अय्युब यांनी ४ हजार रुपयांना १० हजारांच्या बनावट नोटा विकत घेतल्या होत्या. मात्र आवेश फरार असल्याने याचा मास्टरमाईंड कोण? त्याने कुठून आणल्या या बनावट नोटा हे अद्याप उघड झाले नाही.

सावदा पोलिसांसमोर आव्हान
भुसावळ येथील फरार आरोपी आवेश याला पकडल्या शिवाय बनावट नोटा कुठून, कोणाकडून आणल्या? या मागचा मास्टर माईंड कोण, यात आणखी कोण कोण सामील आहेत? या मागे मोठे रॅकेट आहे का? त्यांनी आणखी कुठे बनावट नोटा चलनात आणल्या का? आणखी कुठे बनावट नोटा विक्री केल्या का? या सर्व घटनेचा उलगडा होणार नाही. फरार आरोपी आवेश याचा पोलिस शोध घेत आहेत. याचा शोध घेऊन नकली नोटां प्रकरणाचा उलगडा करून रॅकेटचा पर्दा फाश करण्याचे सावदा पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!