Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईममहाराष्ट्र

बनावट औषधी पुरवठ्याचं रॅकेट, मूळ कंपनीचं नसल्याचं उघड, रुग्णांच्या जीवाशी खेळ

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात बनावट बोगस औषधी पुरवठा सुरू असल्याचं उघड झालं आहे. सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरु आहे. नागपूर, बीड नंतर नांदेड जिल्ह्यात देखील बनावट औषध आढळून आल्यामुळं खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या कंपनीने यापूर्वी बनावट औषध (खासकरून टॅबलेट) शासकीय रुग्णालयाला पुरवली होती, त्याच कंपनीला पुन्हा पुरवठा करण्याची मुभा देण्यात आल्याचं समोर आलं आहे. सर्वात मोठी धक्कादायक माहिती अशी की, बनावट औषध पुरवठ्याचं रॅकेट हे भिवंडीपासून उत्तराखंडमधील हरिद्वार पर्यंत पोहोचलं आहे. पण हरिद्वारमध्ये मूळ कंपनीच अस्तित्वात नसल्याची माहिती आता उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. त्या मुळे आपण घेत असलेली औषधी बनावट तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालातून समोर आलेल्या माहिती नुसार नांदेडच्या शासकीय रुग्णालयात या बनावट औषधांचा पुरवठा केला जात असल्याचं समोर आल्यामुळं एकच खळबळ उडाली. औषधाचा पुरवठा लातूरच्या जया एंटरप्रायजेसकडून करण्यात आला होता. या मागे हेमंत मुळे यांचं नाव समोर आलं आहे. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेलं Meclav 625 हे औषध बनावट असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालात समोर आलं.

या प्रकरणी लातूरच्या जया एंटरप्रायजेस वर नांदेड च्या वजिराबाद पोलिस स्टेशनला १९ आगस्ट ला गुन्हा दाखल करण्यात आला होता, व २५ सप्टेंबर २४ ला अन्न,औषध विभागाने जया एंटरप्रायजेस चा विक्रीचा परवाना रद्द केला होता. मात्र शासनाने ९ ऑक्टोबर ला आदेश काढून परवाना रद्द करून त्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आणि पुन्हा जया एंटरप्रायजेस कडून औषधांचा पुरवठा सुरू झाला.

जया एंटरप्रायजेस सोबत आणखी एक नाव पुढे आले, ते म्हणजे विशाल एंटरप्रायजेस, यांनीही वर्धा मध्ये रुग्णालयांना बनावट औषधी पुरवठा केल्याचं अहवलत उघड झालं. यात कोल्हापूरच्या पाटील नावाच्या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे.

राज्यातील अनेक सरकारी रुग्णालयात बनावट औषधी पुरवठा केला जातो या मागे मोठी साकळी असल्याचं सांगितलं जातं. औषध उत्पादन करणारी कंपनी हरिद्वार येथील असल्याचं सांगितलं गेलं मात्र ही कंपनी हरिद्वार येथे अस्तित्वातच नसल्याच समोर आल्यानं काय गौडबंगाल आहे, औषध नेमाक कुठे तयार केले जाते.राज्यात आणखी कुठे कुठे या बनावट औषधांचा पुरवठा केला गेला. याचाही शोध घेणे गरजेचे आहे. गोरगरिबांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्यांचा पर्दाफाश करावा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!