भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल शहरात पाचशे रूपयाच्या बनावट नोटा चलनात, निवडणुकीत अशा बनावट नोटांचा वापर तर केला जाणार नाही ना?

विशेष प्रतिनिधी l
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l  बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी यावल शहरातील एका बियरच्या दुकानात दारू पिण्यासाठी आलेल्या ४ ग्राहकांकडून बिलापोटी ५०० रुपयाची बनावट नोट चलनात येत असल्याचे लक्षात आल्याने बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ जणांना दुकानदारांने यावल पोलिसांच्या ताब्यात दिले, तर यातील दोनजण सिनेमा स्टाईल पद्धतीने दुचाकीवरून पसार झाल्याची घटना घडली. हा काही नवीन विषय नाही मागील महिन्यात बनावट नोटा प्रकरणात यावल शहरातूनच आरोपी पकडले गेले आहे त्याचे पुढे काय झाले..?

यावल शहरातील यावल भुसावळ रस्त्यावर असलेल्या एका बियर दुकानात बुधवार दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान ४ जण बियर पिण्यासाठी आले असता त्यांचे बियर पिणे झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील असलेल्या नोटांच्या बंडलातुन दुकानदारास बिलापोटी पाचशेची बनावट नोट दिली.

दरम्यान ५०० रुपयांच्या चलनी नोटा या बनावट असल्याचे संशय दुकानदारास आल्याने संबंधित बिअर दुकानातील व्यक्तीला ती नोट बनावट असल्याचे लक्षात आले. दुकानदार तडकाफडकी दुकान बंद करून या बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांच्या सोबत असलेल्या दोन जणांचा बियर दुकानाचे शटर बंद करून पकडून त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले असले तरी आता या बनावट नोटांमागील खरे सूत्रधार कोण आणि कुठले यांचा मागील महिना पकडल्या गेलेल्या आरोपींची काही संबंध आहे का याबाबत अनेक प्रश्न यावल तालुक्यात उपस्थित केले जात आहेत यांनी विधानसभा निवडणुकीत सुद्धा बनावट नोटा चलनात आणलेल्या आहेत का याची चौकशी सुद्धा पोलिसांनी करायला पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

दरम्यान यातील २ जण दुचाकीवरून फरार होण्यात यशस्वी झाले.या संदर्भात यावल पोलिसांकडून या २ जणांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

यावल शहरात बनावट नोटा चलनात येण्याची या महिन्यातील ही दुसरी घटना असल्याचे समोर आले आहे.रावेर यावल विधानसभा मतदारसंघ हा मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन परप्रांतीय राज्याच्या सीमेला लागून असून निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे बनावट नोटा चलनात येत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीत अशा बनावट नोटांचा वापर तर केला जाणार नाही ना? अशीही शंका उपस्थित केली जात आहे. बनावट नोटा चलनात आणणारे कोणा कोणाच्या संपर्कात असतात..? याचा पर्दा फाश पोलिसांच्या गोपनीय शाखेने, आर्थिक गुन्हे शाखेने लावून सत्य काय ते जनतेसमोर आणायला पाहिजे असे सुद्धा आता संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!