भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावभुसावळ

जळगावात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरात ५०० रुपयांच्या नकली बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार २७ जून रोजी रात्री १० वाजता कारवाई करत अटक केली असून त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ८ हजार रुपये किमतीच्या नकली बनावट नोटा, एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघां विरोधात जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य गेटजवळ दोन संशयित व्यक्ती ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लागलीच सापळा रचून रात्री १० वाजेच्या सुमारास सचिन दरबारसिंग राजपूत (वय ३४, रा. रामेश्वर कॉलनी) आणि सचिन संजय गोसावी (वय २३, रा. वाघ नगर, जळगाव) या दोघांना ताब्यात घेत त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून ८ हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या १६ बनावट नोटा, दोन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्र .एमएच १९ डीयू ७८०८ असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला या प्रकरणी दोन्ही आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे पुढील तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!