भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

प्रवाशांच्या सतर्कतेने नकली टीसी भुसावल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावल रेल्वे विभागाकडून माहिती समोर आली असून गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान धावणाऱ्या मुंबई एलटीटी (11080) एक्सप्रेसमध्ये एक महत्त्वपूर्ण घटना घडली. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे S/8 कोचमध्ये एक नकली तिकीट तपासनीस (TC) प्रफुल गजबीये असल्याचे उघड झाले. रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले.

भोपाळ विभागाचे डीवाय सीटीआय मनोज कुमार (1591) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मार्च 2025 रोजी नियमित तपासणी दरम्यान, S/8 कोचमध्ये एक प्रफुल गजबीये व्यक्ती तिकीट तपासणी करत असल्याचे आढळले. अधिकृत ओळखपत्र विचारले असता, त्याच्याकडे रेल्वेच्या कोणत्याही अधिकृत कागदपत्रांचा अभाव होता. यावेळी प्रवाशांनी सतर्कता दाखवत खंडवा ते नेपानगर दरम्यानच हा प्रफुल गजबीये व्यक्ती नकली टीसी असल्याचे ओळखले आणि रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत भुसावळ रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांना माहिती कळवली.

आदित्य (S/8, सीट क्र. 31) – CNB-LTT, अमन (S/8, सीट क्र. 32) – CNB-LTT, अमित कुमार – MEC-DIFF, याशिवाय, ट्रेनमध्ये कार्यरत असलेल्या हाऊसकीपरनेही आरोपीला पकडण्यात मदत केली.

भुसावळ रेल्वे कंट्रोलला S/8 कोचमध्ये नकली टीसी फिरत असल्याची माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे गाडी दुपारी 2:00 ते 2:30 दरम्यान भुसावळ स्थानकावर पोहोचताच, रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) सहाय्यक निरीक्षक एन. के. सिंग आणि कॉन्स्टेबल नितेश कुशवाह तसेच भुसावळ लोहमार्ग पोलिसांचे कॉन्स्टेबल संजय जोशी यांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या प्रफुल गजबीये आरोपीची भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असून, संध्याकाळपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. रेल्वे प्रशासनाचा प्रवाशांना आवाहन
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना फक्त अधिकृत रेल्वे कर्मचाऱ्यांकडूनच तिकीट तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ रेल्वे हेल्पलाईन 139 किंवा नजीकच्या रेल्वे सुरक्षा बलाला कळवावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!