क्राईमरावेर

सततची नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सततच्या नापिकीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील विलास युवराज चोघरी (वय ४०) या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विलास चोघरी हे नेहमी प्रमाणे शेतात गेले होते, मात्र संध्याकाळी घरी परत आले नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता, त्यांच्या स्वतःच्या गट नंबर ७९ मधील शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, सततची नापिकी आणि युनियन बँकेकडून घेतलेले दोन लाख रुपयांचे कर्ज या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पंचायत आई वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात असून निळकंठ चौधरी यांच्या तक्रारीवरून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!