भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

अचानक तोल गेल्याने विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू, यावल तालुक्यातील घटना

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शेतातील विहिरीजवळ काम करीत असतांना अचानक तोल जावून पडल्याने दिलीप उत्तम पाटील वय ५२ रा. गिरडगाव ता.यावल. या शेतकऱ्याचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील गिरडगाव शिवारात घडली आहे

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील गिरडगाव येथील रहिवाशी असलेले दिलीप उत्तम पाटील हे सोमवारी २६ मे रोजी दुपारी ते गिरडगाव शिवारातील शेतातील विहिरीजवळ काम करत असतांना त्यांचा अचानक तोल गेला. ते विहिरीत पडले त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. शेत परिसरात काम करणाऱ्यांनी तातडीने त्यांनी बाहेर काढून यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या घटनेमुळे गिरडगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दिन शेख हे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!