यावल

विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील दौलत देवराम पाटील. वय ५७ वर्ष. रा. थोरगव्हाण ता. यावल या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारदरम्यान शेतकऱ्याचा रविवारी मृत्यू झाला. गुरुवारी दि. ६ मार्च रोजी संध्याकाळी शेतात असताना त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील रहिवाशी दौलत देवराम पाटील. वय ५७ वर्ष. हे पत्नी, दोन मुले, एक मुलगी यांच्यासह थोरगव्हाण येथे राहत होते. शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.

गुरुवारी दि. ६ मार्च रोजी संध्याकाळी शेतात असताना त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या नंतर त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी दि. ९ मार्च रोजी ३ दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!