जळगाव जिल्ह्यातील ५१ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार ४३ हजार ५०० रुपयांची नुकसान भरपाई
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l या उन्हाळ्यात ऊन खूपच तापले. मे महिन्यात तर सलग पाच दिवस ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान होते. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच जण अती तापमानाने हैराण झाले होते. त्याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांना बसला. केळी उत्पादकांना अती तापमानात जर सलग तीन दिवस ४५ अंश तापमान राहिले तर त्यांना नुकसान भरपाई शासन देते. यंदा तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील ५१ महसूल मंडळे पात्र ठरली आहे. सलग पाच दिवस ४५ अंश तापमान राहिल्यामुळे ५१ महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकरी ४३ हजार ५०० रुपयांच्या नुकसान भरपाईच्या रक्कमेसाठी पात्र ठरले आहेत. या आधी एप्रिल महिन्याच्या जास्त तापमानाच्या निकषात ७५ महसूल मंडळ पात्र ठरले होते. तर कमी तापमानाच्या निकषात ३६ महसूल मंडळ २६ हजार ५०० रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले आहेत.
पात्र महसूल मंडळे…
जळगाव तालुक्यातील असोदा, नशिराबाद, भोकर, म्हसावद, पिंप्राळा. मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हे, मुक्ताईनगर. रावेर तालुक्यातील ऐनपुर, खानापूर, खिर्डी बु., खिरोदा, निंभोरा बु., रावेर, सावदा. भडगाव तालुक्यातील भडगाव, कोळगाव. चाळीसगाव तालुक्यातील खडकी बू., शिरसगाव. धरणगाव तालुक्यातील धरणगाव, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद. एरंडोल तालुक्यातील एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण गृह. अमळनेर तालुक्यातील अमळनेर, अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरूड, वावडे. पाचोरा तालुक्यातील कु-हाड बु., पाचोरा. पारोळा तालुक्यातील बहादरपूर, पारोळा,शेळावे, तामसवाडी.भुसावळ तालुक्यातील वरणगाव, चोपडा तालुक्यातील चोपडा, अडावद, चहार्डी, गोरगावले, हातेड बु., लासुर. जामनेर तालुक्यातील जामनेर, नेरी बु., शेंदुर्णी. रावेर तालुक्यातील ऐनपुर, खानापूर, खिर्डी बु., खिरोदा, निंभोरा बु., रावेर, सावदा.