पंढरपूरजवळ भाविकांच्या खासगी बस चा भीषण अपघात,दोघांचा जागीच मृत्यू
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पंढरपूरजवळ भाविकांच्या खासगी भसचा भीषण अपघात झालाय. दुर्देवी घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झालाय. यामध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान अपघात इतका भीषण होता की बसचा चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. यानंतर अपघातामधील जखमींना स्थानिकांच्या मदतीने पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पंढरपूर – टेंभुर्णी या मार्गावरील पंढरपूर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर भटुंबरे गावच्या हद्दीत रविवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास हभप तुकाराम खेडलेकर महाराज मठाच्या समोर हा अपघात झाला. टेंभुर्णी कडून पंढरपूरकडे येत असलेल्या भाविकांची बस ( क्र.एम.एच. 14 एल.एस.3955 ) चा पंढरपूरकडून टेंभुर्णीकडे निघालेल्या मालवाहतूक ट्रक ( क्रमांक आर जे 14 जी एल 1780 ) सोबत समोरासमोर धडक झाली. या अपघातात बस आणि मालवाहतूक ट्रकचा समोरचा भाग चक्काचूर झालेला आहे.