वॅगनार व दुचाकीचा भीषण अपघात, तरुण जागीच ठार, यावल जवळील घटना
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यात यावल-चोपडा रोडवर महाजन पेट्रोल पंपा जवळ वॅगनार व दुचाकीचा आज सकाळी भीषण अपघात झाला या अपघातात यावल तालुक्यातील साकळी येथील युवक जागीच ठार झाला.

यावल तालुक्यातील साकळी येथील रहिवाशी करण विजू जंजाळे (वय ३०वर्ष.) हा तरुण मामा अंत्यविधी साठी मोटर सायकल वर यावल येथे जात असताना महाजन पेट्रोल पंपा जवळ यावलहून साकळी गावाकडे जाणाऱ्या वॅगनार (क्र. MH-19-AP-3273) या चारचाकी वाहनाचा टायर अचानक फुटला. त्यामुळे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून ती थेट करण जंजाळे च्या मोटरसायकलवर आदळून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात करण जंजाळे याचा जागीच मृत्यू झाला. यावल पोलिस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून पुढील कारवाई करीत आहेत.
