भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

सासऱ्याचा सुनेवर लैंगिक अत्याचार, यावल तालुक्यातील घटना

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एका ३२ वर्षीय सुनेवर तिच्या ५६ वर्षीय नराधम सासऱ्याने वेळोवेळी चाकूचा धाक दाखवून जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याची घटना यावल तालुक्यात उघडकीस आली. या प्रकरणी सुनेच्या फिर्यादी वरून यावल पोलीस स्टेशनला सासऱ्या विरोधात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेने यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे.

यावल तालुक्यातील एका गावामध्ये सदर पीडित विवाहितेवर दि. १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान वेळोवेळी सदर पीडित सुनेवर ५६ वर्षीय सासऱ्याने चाकूचा धाक दाखवून जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले व जीवे मारण्याचे धमकी दिली. सदर पीडित विवाहित महिला सध्या अकोला जिल्ह्यात राहत असून सुनेने माहेरी गेल्यावर उरळ, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला येथील पोलिस ठाण्यात सासऱ्या विरोधात तक्रार नोंदवली असून  यावल पोलीस स्टेशनला सासऱ्या विरोधात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.  पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हे पुढील तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!