भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमधुळे

महिला शिक्षण विस्तार अधिकारी १० हजारांची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पंचायत समिती कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या रोहिणी नांद्रे यांना तब्बल १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. सदरची कारवाई धुळे येथील पंचायत समिती कार्यालयात करण्यात आली. या कारवाईमुळे धुळे जिल्हा परिषद आणि शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदे, ता.जि. धुळे येथे प्रभारी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत. दि.०७.०८.२०२५ रोजी रोहिणी नांद्रे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती धुळे. यांनी सदर शाळेस भेट दिली असता विदयार्थ्यांची पट संख्या कमी असल्याने तक्रारदार यांचा वरिष्ठांना प्रतिकुल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेस समग्र शिक्षा योजने अंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात स्वतः करीता व शिक्षण अधिकारी प्राथमिक श्रीमती कुवर यांचेकरीता १०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.


सदर तक्रारीची दि.११.०८.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता रोहिणी नांद्रे यांनी स्वतःकरीता व शिक्षण अधिकारी श्रीमती कुवर यांचेकरीता १०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले होते.

त्यानंतर आज दि.१२.०८.२०२५ रोजी सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान रोहिणी दत्तात्रेय नांद्रे, वय -,४३, पद-शिक्षण विस्तार अधिकारी,पंचायत समिती धुळे. खाते- जिल्हा परिषद, धुळे. रा.प्लॅाट नं. ५/ब, जय गुरुदेव नगर, वाडी भोकर रोड, देवपुर, धुळे. यांनी पंचायत समिती, धुळे कार्यालयातील त्यांचे कक्षात सदर लाचेची रक्कम तक्रारदार यांचेकडुन स्वतः स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात येवुन त्यांचे विरुध्द भ्र.प्रति.अधि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पर्यवेक्षण अधिकारी श्री. सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग.धुळे. सापळा व तपासी अधिकारी.यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, धुळे.यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!