क्राईमजळगावधरणगाव

महिला पोलिस कर्मचारी व पोलिस पथकाला धक्काबुक्की

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एका गुन्ह्यातील संशयित आरोपी आणि अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसा पथक धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात गेले असता पोलीस पथकातील महिला पोलिस व पथकातील पोलिसांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात एका गुन्ह्यातील संशयित आरोपी आणि अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता गेले असता एका घरात आरोपीचा शोध घेत असताना पथकातील महिला पोलीस कॉन्स्टेबल योगिता पाचपांडे यांच्यासह पोलीस पथकाला भारती राहुल सोनवणे, प्रियंका किशोर सोनवणे, मीराबाई युवराज सोनवणे, राहुल युवराज सोनवणे आणि किशोर युवराज सोनवणे (सर्व रा. पाळधी , ता. धरणगाव) यांनी अरेरावीची भाषा वापरत धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

या संदर्भात महिला पोलीस कॉन्स्टेबल योगिता पाचपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी  ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात भारती राहुल सोनवणे, प्रियंका किशोर सोनवणे, मीराबाई युवराज सोनवणे, राहुल युवराज सोनवणे आणि किशोर युवराज सोनवणे (सर्व रा. पाळधी , ता. धरणगाव) या पाच जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मधुकर उंबरे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!