महिला प्राचार्यांवर अत्याचार, व्हिडिओ, फोटो व्हायलर करण्याची धमकी देत पैसेही उकळले
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत प्राचार्य असलेल्या महिलेवर वाहन चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यात उघडकीस आली. तसेच ब्लॅकमेल करत पीडित महिलेकडून ३ लाख ३० हजार रुपये उकळले असून याप्रकरणी मध्यप्रदेशातील राजासिंग अग्निदेवसिंग चव्हाण या इसमाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात रहीवास असलेल्या ३५ वर्षीय महिला दुसऱ्या जिल्ह्यातील तालुक्यात प्राचार्य आहे. त्या महिलेचा पती एका गुन्ह्यात कारागृहात असतांना पतीची मध्यप्रदेशातील संशयित राजासिंग अग्निदेवसिंग चव्हाण याच्याशी ओळख झाली. महिलेच्या पतीने चव्हाण यास संपर्कासाठी पत्नीचा मोबाईल नंबर दिला होता. कारागृहातून बाहेर आलेल्या राजासिंग चव्हाण हा ऑक्टोबर २०२४ मध्ये चाळीसगाव येथे एका पुढाऱ्याच्या ओळखीने चाळीसगाव येथे आला होता. त्यावेळी त्याने त्या महिलेची भेट घेतली होती. त्यानंतर महिलेच्या वाहनाचा चालक म्हणून काम करू लागला. डिसेंबर २०२४ मध्ये संशयित राजासिंग चव्हाण याने महिला महाविद्यालयात गेली असता, तेथे दारूच्या नशेत महिलेशी वाद घालून वाहनात बळजबरीने बसविले. त्यानंतर चाळीसगाव येथील एका लॉजवर नेवून त्याने प्राचार्य महिलेवर अत्याचार केला.
लॉजवरील, व्हिीडीओ, फोटो काढून ब्लॅकमेल करू लागला. हे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत महिलेकडून सुमारे ३ लाख ३० हजार रूपये उकळले.
पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग पोलीसांना सांगितला. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राजासिंग चव्हाण याचे विरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी हे करीत आहेत.