भुसावळ संतोष बारसे व सुनील राखुंडे हत्याकांडातील पाचव्या आरोपीला मध्यप्रदेशातून अटक
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या हत्या प्रकरणांमध्ये जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) ने मध्य प्रदेशातील छनेरा गावामधून विष्णू पथरोड या पाचव्या आरोपीला अटक केली आहे. पुढील कार्यवाहीसाठी त्याला भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
भुसावळ येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी आता अटकेत असलेल्या संशयित आरोपींची संख्या ५ वर पोहोचली असून यात यापूर्वी राजू सूर्यवंशी, विनोद चावरिया, करण पथरोड, गोपाल कोळी यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान छनेरा गावात विष्णू पथरोड असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार तेथे जाऊन विष्णु पथरोड याच्यासह त्याच्या दोन नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र चौकशी अंती दोन्ही नातेवाईकांना सोडून देण्यात आले आहे. तर विष्णू पथरोड याला अटक करून भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. एलसीबी चे प्रभारी निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.