क्राईमरावेर

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करा, रावेर तालुका पत्रकार संघाची निवेदनाद्वारे मागणी..

ऐनपूर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज, विजय के अवसरमल | पाचोरा शहर आणि तालुक्यात ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत (सट्टा, पत्ता, ऑनलाईन चक्री) पाचोरा येथील पत्रकार राकेश सुभाष सुतार आणि इतर पत्रकारांनी बातम्या प्रसारित केल्या. या बातम्यांमुळे अवैध व्यवसाय चालवणारा शेखर पाटील उर्फ भोला (रा. कृष्णापुरी) याने पत्रकार राकेश सुतार यांना सार्वजनिक ठिकाणी जीवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिली.

त्यामळे या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन पत्रकार संरक्षण कायद्यानुसार, या प्रकरणी शेखर पाटील उर्फ भोला यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. तसेच, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली याचीही चौकशी करावी. मागील सात ते आठ दिवसांचे शेखर पाटील उर्फ भोला यांचे फोन कॉल रेकॉर्ड (CDR) काढून तपास करावा,  या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी . अश्या आशयाचे निवेदन रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा वतीने रावेर .तहसीलदार, पो.निरीक्षक रावेर यांना देण्यात आले.


निवेदनावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी (शिवा भाई ), म.राज्य पत्रकार संघ रावेर तालुका अध्यक्ष विजय अवसरमल, कार्याध्यक्ष विनायक जहुरे,जळगाव ग्रामीण जिल्हा सरचिटणीस सुरेश पवार,रावेर शहर अध्यक्ष शेख हमीद शेख रफीक,रावेर शहर कार्याध्यक्ष चंद्रकांत वैदकर,विजय काशीनाथ अवसरमल, प्रविण पाटील, श्रीराम गंवळी,रहुफ खाटीक आधीचे सह्या आहेत. त्याचबरोबर निवेदनाचे प्रति राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, ग्रह सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र ,व जिल्हाधिकारी जळगाव, जळगाव पोलीस अधीक्षक  यांना पाठविण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!