अखेर भाजपच्या विधिमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस, मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भाजपचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत झालं. त्यानंतर आता विधिमंडळ पक्ष बैठकीत संमत होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होतील अशी आता औपचारिकता राहिली असल्याबाबत माहिती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
या बैठकीत निरीक्षक म्हणून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन देखील उपस्थित होते. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आता भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची बैठक होणार आहे. या बैठकीत रणधीर सावरकर हे गटनेता निवड बैठकीत संचलन करतील. तर सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील हे प्रस्ताव मांडतील. रविंद्र चव्हाण हे प्रस्तावाला अनुमोदन देतील, अशी माहिती समोर आली आहे. उद्या दि. ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.