यावल

अखेर “तो” नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात रत्ना रूपनर ही दोन वर्षाची बालिका रात्रीं आई जवळ झोपली असताना बालिकेवर झडप घालून ठार करणारा नरभक्षक बिबट्या वन विभागाने लावलेल्या सापळ्यात अडकला असून त्याला वन खात्याने ताब्यात घेतले आहे.

या अधिक वृत्त असे की, यावल तालुक्याच्या पश्चीम भागात व विशेष करून किनगाव-डांभुर्णी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्मित झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी किनगाव शिवारामध्ये बिबट्याने बालकाला ठार केले होते. आणि आता डांभुर्णि शिवारात रत्ना रूपनर या दोन वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याने परिसर हादरला असताना कोणीही शेतकरी अथवा शेत मजूर शेतात जायला घाबरत होते.

दरम्यान, वन खात्याने काल बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावला. असं सांगितलं जातं की, ज्या ठिकाणी एकदा शिकार केली त्याच ठिकाणी बिबट्या पुन्हा आठ ते दहा तासात पुन्हा येतो .म्हणून बिबट्यां त्या ठिकाणी पुन्हा येण्याची शक्यता गृहीत धरून शेळ्या-मेंढ्यांनी युक्त असलेला पिंजरा तेथे ठेवण्यात आला. रात्री सुमारे साडेनऊ वाजेच्या सुमारास बिबट्या तेथे आला आणि पिंजऱ्यात अडकला.

दरम्यान , बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुध्द करण्यात आले असून त्याला नागपूर जिल्ह्यातील बोरगाव परिसरातल्या घनदाट अरण्यात सोडण्यासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!