भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावधरणगाव

अखेर “त्या” पोलिस उपनिरीक्षकाचा जमीन मंजूर

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पोलिस उपनिरिक्षक पदावर कार्यरत असलेल्या शरद सैंदाणे यांचा पत्नीच्या छळप्रकरणी न्यायालयाने अखेर अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक शरद सैंदाणे यांचे सह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात बाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील मुळ रहिवासी असलेले व सध्या गोंदिया येथे उपनिरिक्षक पदावर कार्यरत असलेले शरद सैंदाणे व त्यांचे नातलग छगन महादू सैंदाणे, आशा हर्षल सैंदाणे, सुनिल गोपींचंद सोनवणे, रेखा सुनील कोळी, सचिन शेनफडू सैंदाणे, मयुर सुनील कोळी यांच्या विरुध्द शरद सैंदाणे यांच्या पत्नीने, पत्नीस त्रास देणे, न सांगता घरातून निघून जाणे,पत्नीस सुरत येथे गर्भलिंग चाचणी करण्यास भाग पाडणे, तसेच पत्नीला झालेले मुल मृत भावाच्या पत्नीस दत्तक देण्यासाठी दबाव आणणे अशा अनेक प्रकरणी तालुका पोलिस स्टेशन २५७/२०२४ नुसार तक्रार नोदवण्यात आली होती.

सदर तक्रारी वरुन शरद सैंदाणे यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात दाद मागीतली होती. अर्जदार/आरोपी पोलिस उप निरीक्षक शरद छगन सैंदाणे, छगन महादू सैंदाणे, आशा हर्षल सैंदाणे, सुनील गोपीचंद कोळी (सोनवणे), रेखा सुनील कोळी (सोनवणे) , सचिन शेंफडू सैंदाणे आणि मयूर सुनील कोली (सोनवणे) यांना तपास अधिकाऱ्याने जेव्हा आणि जेव्हा बोलावले जाईल तेव्हा ते संबंधित पोलिस स्टेशनमध्ये हजर राहतील आणि त्याला सहकार्य करतील. तसेच ते पुराव्यांशी छेडछाड करणार नाहीत किंवा माहिती देणाऱ्यावर प्रभाव टाकणार नाहीत. या अटीवर अटकपूर्व जामिन मंजूर करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!