भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगर मध्ये झालेल्या गोळीबाराच्या ” मंडे टू मंडे न्यूज ” च्या वृत्तावर “सिटी स्कॅन रिपोर्ट” मध्ये अखेर शिक्कामोर्तब !

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज, अक्षय काठोके | मुक्ताईनगर मध्ये चार अज्ञात व्यक्तींकडून १९ डिसेंबर गुरुवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास चाकू हल्ला व गोळीबार करून एक लाख रुपयांची लूट करण्यात आली होती. यात मंगेश खेवलकर यांचेवर गोळी झाडून त्यांच्या पोटात चाकू खुपसला होता. तर रमेश खेवलकर व रविंद्र खेवलकर यांचेवरही चाकू हल्ला केला होता त्यात ते किरकोळ जखमी झाले होते. या वेळी गोळीबार झाल्याचे एकमेव वृत्त सर्वात प्रथम मंडे टु मंडे न्युज ने दिले होते. या वेळी खरंच गोळीबार झाला का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु अखेर  “मंडे टू मंडे न्यूज ” च्या गोळीबाराच्या वृत्तावर सीटी स्कॅन रिपोर्टमध्ये स्पष्ट झाल्याने शिक्कामोर्तब झाले आहे. गोळी काढण्यात आली आहे.

याबाबत अधिकृत असे की, दोन दिवस आधी म्हणजेच गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील प्रवर्तन चौकात मंगेश खेवलकर यांच्यावर अज्ञाताकडून गोळीबार व चाकुहल्ला करण्यात आला होता. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना आधी जळगाव येथे शासकीय रुग्णालयात व नंतर संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येऊन शस्त्रक्रिया करून त्यांच्या शरीरातली गोळी काढण्यात आली आता त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे समजते. हल्ला झाला तेव्हापासूनच “मंडे टू मंडे न्यूज” ने गोळीबाराचे वृत्त लावून धरले होते तसेच सगळीकडे फक्त चाकू हल्ला झाला, गोळी बार झाला नाही अशा चर्चा चालू होत्या. परंतु मंडे टू मंडे न्यूज ने सर्वात आधी अज्ञाताकडून मुक्ताईनगरात गोळी बार व चाकु हल्यात एक १ गंभीर जखमी या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली. ही बातमी आज खरी ठरली.

भर चौकात गोळीबार झाल्यामुळे मुक्ताईनगर येथील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण..पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज?
मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौक हे वर्दळी चे ठिकाण असून या चौकात गोळीबार झाल्यामुळे आजूबाजूच्या व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे या चौकामध्ये ज्वेलरी शॉप, बँका, पतसंस्था, हॉटेल, किराणा, मोबाईल व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिकांची दुकाने व कार्यालय आहेत. जर खुले आम येथे गोळीबार होत असेल तर त्यामुळे असुरक्षिततेची भावना व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे?

भर चौकात गोळीबार झाल्यामुळे मुक्ताईनगर येथील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी मुक्ताईनगर पोलिसांनी आता गस्त वाढवण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकात बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!